Friday, February 14, 2025

जागतिक गिर्यारोहक अन्वी घाटगे 12 हजार 500 फूट उंचीवरील हिमालयातील केदारकंठ शिखरावर शिवजयंती दिवशी शिवध्वज फडकविणार

कोल्हापूर, विकास न्यूजसेवा :
महाराष्ट्र व कोल्हापूरची कन्या जागतिक विक्रमवीर  गिर्यारोहक अन्वी अनिता चेतन घाटगे, (वय 5 वर्षे) जगातील सर्वात लहान गिर्यारोहक व जगातील वेगवान climber म्हूणन ओळख असलेली कोल्हापूरची चिमुकली अन्वी 12 हजार 500 फूट उंचीवरील हिमालयातील केदारकंठ शिखरावर शिवजयंती दिवशी शिवध्वज फडकविणार आहे.

अन्वीने आतापर्यंत गिर्यारोहन क्षेत्रात 5 वर्ल्ड रेकॉर्ड, 6 आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, 6 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची नोंद केली आहे. वयाच्या अवघ्या 2 वर्षे 11 महिनेची असताना महाराष्ट्रतील सर्व्वोच कळसुबाई शिखर चढाई करत वर्ल्ड रेकॉर्ड केले. तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील सर्व्वोच शिखरे कमी वयात सर केले आहेत. 62 गडसंवर्धन मोहीम राबवत छत्रपती शिवराय यांचे गड सांभाळीन हेचि जीवन हा ध्यास त्यांचा आहे. शिवजयंती म्हणजे शिवविचारांचा जागर, धीरता, वीरता आणि मावळ्यांचे बलिदान यांना आठवत जगण्याची निष्ठा आणि हाच विचार पेरता यावा व गडकोट दुर्ग संवर्धन करूयात हा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी, उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील १२ हजार ५०० फूट उंचीवर असलेले केदारकंठा हे शिखर सर करण्यासाठी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी मुख्य चढाईस सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी 19 फेब्रुवारी रोजी शिखरावर पोचून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवध्वज फडकाऊन, छ. शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करणार आहे. त्यासाठी ती 13 फेब्रुवारी रोजी रवाना झाली आहे.

यावेळी अन्वी यांना या हिमालय शिखर चढाई मोहीम साठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी शिवध्वज देत शुभेच्छा दिल्या. तसेच  आमदार  राजेश क्षीरसागर, उपमहाराष्ट्र केसरी अमृतमामा भोसले, शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहा.पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, विशाल मुळे, पोलिस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, अनिकेत कुंडले, शंकर कोळी, अमर कांबळे व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तसेच चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे ऑपरेशन मॅनेजर राजेंद्र पाटील आणि सर्व स्टाफ, प्रकाश पब्लिक स्कुलच्या अध्यक्षा सुनीता पाटील, प्रतिकदादा पाटील, आनद पोवार व विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवप्रेमी, गिरीप्रेमी यांनी मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वडील चेतन घाटगे, प्रशिक्षक व आई अनिता घाटगे, प्रा. अनिल मगर हे अन्वी सोबत मोहिमेसाठी रवाना झाले आहेत. युवा वर्ल्डचे तेजस जिबकाटे यांनी मोहीम आखणी केली आहे.
==========

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...