Thursday, January 16, 2025

आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आजरा, वृत्तसेवा :
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भाजपा पक्ष वाढवणेसाठी जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी हे संघटनात्मक प्रयत्न करत असून अनेक खेडेगावातील तरुण भाजपामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर (ग्रामीण) उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचे मार्गदर्शनाखाली संभाजी रामचंद्र पाटील (दाभिल), अशोक बचाराम करंबळी (मुमेवाडी), दीपक प्रकाश हेळवे (चंदगड), शिवराज संभाजी लोखंडे (वझरे), रूपेश दत्तात्रय लोखंडे (वझरे), सुशांत निंगाप्पा कांबळे (येमेकोंड), कुणाल रविंद्र ससाणे (आर्दाळ), मयूरेश रमेश कांबळे (मुरुडे), संस्कार रामचंद्र करंबळकर (मुरुडे) यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी आजरा तालुका भाजपा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर, सरचिटणीस आतिश देसाई व उत्तूर शहर प्रमुख राजवर्धन मांढरे उपस्थित होते.
==============

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...