आजरा महाविद्यालय, आजरा येथे भूगोल व पर्यावरणशास्त्र विभाग, पृथ्वी ग्रीन क्लब, विज्ञान आणि पर्यावरण मंडळ, भारतीय जल संस्कृती मंडळ, किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स आणि लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी या जागतिक भूगोल दिनानिमित्त 'जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता ' कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
भारतीय जलसंस्कृती मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जल आणि पर्यावरण जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून हसत खेळत पर्यावरण या उपक्रमांद्वारे खेळाच्या माध्यमातून पर्यावरांतील अन्न शृंखला, जीवन जाळे, जलसंधारण, पाण्याचा अपव्यय टाळणे, जल संकलन, जल संरक्षण, जलसंवर्धन व जल व्यवस्थापन कसे करावे यासाठी त्यानी अग हरणी, अरे ससाणा ससाणा, जीवन जाळे, चमचा पाणी शर्यत आधी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. डॉ. जगदाळे यांनी पीपीटी च्या माध्यमातून जलसंसाधन व्यवस्थापन, जल पर्यावरण,रेन वॉटर हार्वेस्टिंग, जल पर्यावरण चळवळीची माहिती दिली तसेच जल पर्यावरण चळवळी संबंधी माझी भूमिका, स्थानिक जल समस्या दूर करण्याचे उपाय असे सहभागींची गटचर्चाही घेण्यात आली. या माध्यमातून तुम्ही उत्तम जलदूत व्हा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा व जलसंवर्धनाचा प्रचार व प्रसार करा असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक सादळे यांनी जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता कार्यशाळा चे आयोजन हे महाविद्यालयीन तरुण-तरुणीनी प्रशिक्षण घेऊन सहकार्य, संघटन व नेतृत्व कौशल्याद्वारे आपले पर्यावरण आणि जलस्रोत जलसाठे सुरक्षित व संवर्धित व्हावेत यासाठी जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता बनवून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले पाहिजे असे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. रणजीत पवार यांनी केले तर स्वागत पर्यावरण व ग्रीन क्लब विभाग प्रमुख प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांनी केले तर आभार प्रा.रत्नदीप पवार यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी भारतीय जल संस्कृती मंडळ कोल्हापूरचे कोषाध्यक्ष श्रीमती प्रतिभा शेट्टी तसेच सायबर कॉलेज कोल्हापूरचे एम एस एस डब्ल्यू विभागाचे मास्टर ट्रेनर शाम मानकर, विजय घोंगले, संकेत पिसे, रितेश म्हासाळ, विशाल अंभोरे , अभिषेक परिघर, तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा.मनोजकुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील तसेच प्रा.डॉ.शिवानंद गजरे, प्रा.सौ.ज्योती कुंभार, प्रा.सौ शुभांगी सावंत, प्रा.संजय गाइंगडे, प्रा.भूषण गावडे, प्रा.भारत वायकस्कर, प्रा.अरुण सूरुंगले, प्रा.सागर फगरे, प्रा.अविनाश संकेश्वरी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment