केदारी रेडेकर धर्मादाय रूग्णालयामार्फत ग्रामिण भागातील गरजू रूग्णांना गडहिंग्लज येथील हाॅस्पिटलमध्ये येणे जाणे करीता मोफत आरोग्य रथाची सोय केली असलेचे प्रतिपादन केदारी रेडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व गोकुळ दुध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी व्यक्त केले. त्या मलिग्रे (ता. आजरा) येथे केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य रथाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. आरोग्य रथाचे उदघाटन मलिग्रे सरपंच शारदा गुरव यांनी केले. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी आजरा पूर्व भागातील कोळिंद्रे, कागिनवाडी, मलिग्रे, कानोली, सरबंळवाडी, हारूर, गजरगाव, इंचनाळ मार्गे दर गुरूवार या भागातील रूग्णांना मोफत ने आण करण्यासाठी आरोग्य रथाची सोय केली तसेच कै.केदारी रेडेकर हाॅस्पिटल मार्फत अल्प दरात व शासकीय योजना उपलब्ध असून, गरजू रूग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी माजी सरपंच समिर पारदे, गजानन देशपांडे, दत्ता परिट, उपसरपंच चाळू केंगारे, आनंदा बुगडे, पत संस्था चेअरमन केशव बुगडे, विश्वास बुगडे, शिवाजी भगुत्रे, अक्षय कांबळे, बाळू कांबळे, विनायक पाटील यांचे सह मलिग्रे ग्रामस्थ उपस्थित होते आभार माजी सरपंच अशोक शिंदे यांनी मानले. या आरोग्य रथाची सुरूवात कोळिद्रे येथून केली असून प्रत्येक गावा गावात या रथाचे उदघाटन व स्वागत करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment