रविवार दि. 19 जानेवारी रोजी आजरा येथे बकासुर प्रेमी यांच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यत ओपन सेकंद (महाराष्ट्र-कर्नाटक) स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक रवींद्र पारपोलकर यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. अशा प्रकारची बैलगाडी शर्यत आजरा तालुक्यात प्रथमच होत आहे.
या स्पर्धेसाठी 15001रु., 12001रु., 10001रु., 8001रु., 6001रु., 4001रु., 2001रु. व विजयी सर्व क्रमांकासाठी शील्ड अशी बक्षिसे आहेत. प्रवेश फी 1000 रुपये आहे. आजरा शहरातील गांधीनगर जवळ असणाऱ्या आजरा क्रीडा संकुल येथे रविवारी सकाळी दहा वाजता या स्पर्धा सुरुवात होणार आहेत. या स्पर्धा शासनाच्या नियमानुसार पार पडणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आजऱ्याचे माजी नगरसेवक किशोर पारपोलकर, शिवसेना आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, स्वामी विवेकानंद पतसंस्था उपाध्यक्ष सुधीर कुंभार, रमण सावंत, अश्विन डोंगरे, अशोक पाचवडेकर, दत्ता पारपोलकर, संदीप पारपोलकर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांसाठी उपस्थित राहून शर्यतीचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment