जनता एज्यूकेशन सोसायटी आजरा संचालित आजरा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ रविवार (दि.19) व सोमवार (दि.20) रोजी संपन्न होणार आहे. विविध गुणदर्शन कार्यक्रम सोमवारी दुपारी 4.00 वाजता होणार आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे व स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. एस. ए. मोरे यांनी केले आहे.
रविवारी सकाळी रवळनाथ पूजन व ध्वजवंदनाने स्नेहसंमेलनाची सुरवात होणार आहे. त्यानंतर रांगोळी व हस्तकला प्रदर्शन उद्घाटन, भित्तीपत्रिका उद्घाटन, शेलापागोटे उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 9.00 वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. हा समारंभ जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली व जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ तसेच सल्लागार मंडळाच्या हस्ते संपन्न होणार आहे. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी झी मराठी हास्य सम्राट फेम, विनोदी वक्ते प्रा. अजितकुमार कोष्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी स्टॉल उद्घाटन, फनी गेम उद्घाटन व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उद्घाटन होणार आहेत दुपारी 4:00 वाजता विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक वाय. आय. पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख एस. ए. मोरे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. डी. जे. पाटील, जिमखाना विभागप्रमुख प्रा. ए. एस फर्नांडिस, व्होकेशनल विभाग पर्यवेक्षक प्रा. एम. एस. पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment