गजानन ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या, आजरा व ब्राह्मण विकास मंडळ आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 22 जानेवारी रोजी प्रसिध्द व्याख्याते, साहित्यिक व अभिनेते शरद पोंक्षे यांचे "स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते होणार आहे.
गजानन पत संस्थेला स्थापन होऊन २९ वर्षे पूर्ण झाली व ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. २९ व्या वार्षिक सभेत संचालक मंडळाने आवाहन केल्या प्रमाणे संस्थेतर्फे व्याख्यान आयोजित करून समाजासमोर चांगले विचार मांडण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आजरा महाविद्यालय आजराच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गजानन पतसंस्था व आजरा तालुका ब्राह्मण समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment