आजरा अर्बन बँकेच्या डोंबिवली शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न
आजरा, वृत्तसेवा :
मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या डोंबिवली शाखेचा स्थलांतर सोहळा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे शुभहस्ते व अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला राधानगरी-भुदरगड-आजराचे आमदार प्रकाश आबिटकर, कल्याण-डोंबिवलीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोकअण्णा चराटी व संचालक प्रमुख उपस्थितीत होते.
याप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण भागात स्थापन झालेल्या आजरा बँकेने केलेल्या अलौकिक प्रगतीबद्दल अभिनंदन करून आजरा बँकेने खाजगी व राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच प्रगती केली असलेचे गौरवउदगार काढले. अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागात स्थापन झालेली व शहरामध्ये शाखांचा विस्तार असणारी मल्टीस्टेट दर्जाची आजरा बँक ही अग्रगण्य बैंक म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिकास पात्र झाली असलेचे सांगितले तसेच नॅशनल बँका ज्या सेवा सुविधा देत आहेत त्या सर्व आपल्या बँकेकडे उपलब्ध असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बैंकिग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code या सुविधांची माहिती दिली.
उदघाटन प्रसंगी नगरसेवक रमाकांत पाटील, जालींदर पाटील, पंढरी म्हात्रे, रवी म्हात्रे, गिरीधर कुराडे, दशरथ होडगे, विजयकुमार पाटील, भैरु टक्केकर, अनिकेत चराटी, राजू परुळेकर, महेश पाटील, प्रकाश गावडे, तसेच बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर, व्हा. चेअरमन सुनिल मगदुम संचालक सुरेश डांग, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक,मारुती मोरे, आनंदा फडके, प्रणिता केसरकर, शैला टोपले, अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले तर आभार बँकेचे संचालक विलास नाईक यांनी मानले.
==============
No comments:
Post a Comment