Friday, December 20, 2024

आजऱ्यात अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने

आजऱ्यात अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने
आजरा, वृत्तसेवा :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेर्धात आजऱ्यात महाविकास आघाडी व आंबेडकरप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात आली. महाविकास आघाडी कार्यकर्ते व आंबेडकरप्रेमी येथील संभाजी चौकात एकत्र येत गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने केली.शहा व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व राजिनाम्याची मागणी केली.
    यावेळी बोलतांना काॅ.संपत देसाई म्हणाले, संविधान निर्माण करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे उद्गार केले.या लोकांना सत्तेचा माज आला आहे.सत्तेच्या जोरावर संविधान बदलू पहात आहे मात्र हे आम्ही करु देणार नाही. सतिश कांबळे म्हणाले, भाजप व आरएसएस मध्ये तुच्छतेची भावना आहे त्यामुळेच महामानवांबद्दल अपशब्द काढतात मात्र जनता या पिलावळीला आगामी निवडणुकांत खाली खेचेल.जातीवाद संपवण्यासाठी रस्त्यावरील लढाई करावी लागेल. युवराज पोवार म्हणाले,भाजपचा खरा चेहरा बाहेर पडला आहे.संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न भाजप व आरएसएस करत आहेत.संविधानावर करण्याचा प्रयत्न सुरु आहे पण या देशातील जनता होवू देणार नाही.बहुमताच्या आधार घेत देश हुकूमशाहीकडे नेत आहे.प्रसंगी आम्ही छातीवर गोळ्या घेवू मात्र हे कदापिही होवू देणार नाही. यावेळी नवनाथ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, माजी नगरसेवक किरण कांबळे, मंजूर मुजावर, प्रकाश मोरुस्कर, डॉ.उल्हास त्रिरत्ने, विक्रम देसाई, रविंद्र भाटले, वंचितचे वसीम मुल्ला,दगडू कांबळे, इम्तियाज माणगांवकर यांच्यासह महाविकास आघाडी व आंबेडकरप्रेमीं कार्यकर्ते उपस्थित होते.
=========================

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...