शुक्रवार पासून ऐनापूर येथील ईश्वरलिंग मंदिर जिर्णोध्दार, प्राणप्रतिष्ठापना व वास्तुशांती कार्यक्रम
गडहिंग्लज, वृत्तसेवा :
मौजे ऐनापूर, (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील जिर्णोध्दार केलेल्या ईश्वरलिंग मंदिराची वास्तूशांती, प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण लोकार्पण, महाप्रसाद, ज्ञानदासोह कार्यक्रम शुक्रवार (दि. २०) ते सोमवार (दि. २३) या कालावधीत संपन्न होत आहे.
प्राचीनकालिन ईश्वरलिंग मंदिराच्या वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना, कलसारोहण, लोकर्पण सोहळा समारंभानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.२०) रोजी सकाळी ८.०० वा. अग्नीस्थापना व होमहवन कार्यक्रम, सकाळी ११.०० वा. रुद्रपठन कार्यक्रम (रुद्राणी जंगम महिला मंडळ, सांगली), दुपारी १२.०० वा. ईश्वरलिंग मंदिर विशेषांक प्रकाशन हस्ते श्री. प.पू. किसन महाराज, तमर्थ नगर, भडगाव. शनिवार (दि. २१) रोजी सकाळी ८.०० वा. होमहवन कार्यक्रम, संध्याकाळी ७.०० वा. दिपोत्सव कार्यक्रम, सायंकाळी ८.०० वा. कीर्तनसोहळा - ह.भ.प. सत्यजित महाराज निकाडे कुर्लीकर (कर्नाटक भुषण युवाकीर्तनकार) (तालुका अध्यक्ष, विश्ववारकरी संत साहित्य परीषद महाराष्ट्र राज्य निपाणी व चिक्कोडी). रविवार (दि. २२) रोजी सकाळी ८.०० वा. कळस व सुवासिनी कुंभ मिरवणूक गारवा व हळदी कुंकू कार्यक्रम, सकाळी ११ ते ०२ वा. निमंत्रित महाराज यांचे आगमन सन्मान व प्रसाद, सोमवार (दि. २३) रोजी सकाळी ९.०० वा. मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व रुद्राभिषेक, सकाळी १०.०४ वा. कळसारोहन कार्यक्रम, दुपारी १२.०० वा. : महाप्रसाद. असे कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दि. २० ते सोमवार दि. २३ या कालावधीत ईश्वरलिंग भजनी मंडळ ऐनापूर, कोवाडे, निंगुडगे, सरोळी, अत्याळ, इंचनाळ, गिजवणे, हरळी बु।।, मुगळी या गावातील सांप्रदायिक भजनी मंडळांचा दिवसभर भजनाचा कार्यक्रम व दिंडी सोहळ्यात सहभाग. या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री. म. नि. जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ, निडसोशी, श्री. म. नि. प्र. जगद्गुरु निजलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान मठ, निडसोशी, श्री. म. नि. प्र. गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी सुक्षेत्र कारीमठ, हत्तरगी, श्री. ष. ब्र. गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी सुरगीश्वर मठ, नूल, राष्ट्रीय धर्माचारी, परमपूज्य, भगवान गिरी महाराज मठाधिपती रामनाथ गिरी, नूल, श्री. म. नि. प्र. महांत सिद्धेश्वर महास्वामीजी बेलबाग आश्रम, गडहिंग्लज, श्री. म. नि. प्र. प्रभू देवरु प्रभू लिंगेश्वर मठ, कमत्यानट्टी, श्री. प. पू. किसन महाराज समर्थनगर मठ, भडगाव, श्री. म. नि. प्र. अभिनव मृत्युंजय महास्वामीजी क्यारगूड मठ, हुक्केरी अशा विविध संतांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ईश्वरलिंग मंदिर जिर्णोध्दार समिती ऐनापूर, ग्रामपंचायत मौजे ऐनापूर, ऐनापूर ग्रामस्थ मंडळ, मुंबई, ऐनापूर ग्रामस्थ मंडळ, पुणे, ऐनापूर ग्रामस्थ मंडळ, कोल्हापूर, मंदिराचे सर्व देणगीदार व ऐनापूर ग्रामस्थ, ऐनापूर गावातील सर्व तरूण मंडळे, ऐनापूर गावातील सर्व महिला बचत गट, ऐनापूर गावातील सर्व सहकारी संस्था यांनी केले आहे.
=====================
No comments:
Post a Comment