Friday, December 20, 2024

व्यंकटराव हायस्कूल मध्ये माजी शिक्षकांचा "शिक्षक सन्मान सोहळा" संपन्न

व्यंकटराव हायस्कूल मध्ये माजी शिक्षकांचा "शिक्षक सन्मान सोहळा" संपन्न
आजरा प्रतिनिधी 

आजरा महाल शिक्षण मंडळ संस्थेच्या माजी शिक्षक सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. या सोहळ्यासाठी संस्थेअंतर्गत विविध शाखांतून सेवानिवृत्त झालेले ३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचा संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
   
प्रास्ताविक शिवाजी पारळे यांनी केले , एम. ए. पाटील व पी एस गुरव यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा परिचय करून दिला. सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये ए. के. पावले, एस. जी. इंजल, बी.बी. गुरव व सी. आर. देसाई यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
 
 यावेळी संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व शिक्षकांना या शिक्षक सन्मान सोहळ्याचे आपले उदात्त उद्दिष्ट सांगितले.. यामध्ये प्रथम त्यांनी संस्थेतील विविध शाखांमधून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी आजरा तालुक्यातील विविध खेडोपाडी ,वाडी वस्ती मधून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करून प्रसंगी त्या विद्यार्थ्यांचा स्वतः खर्च करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. प्रतिवर्षी आपले शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करत शाळेच्या व संस्थेच्या नावलौकिकत भर टाकत आज व्यंकटराव हा ब्रँड निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आज पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण संस्थेच्या एका छताखाली जयवंतराव शिंपी यांच्या दूरदृष्टी , अथक परिश्रमातून व सुसज्ज तीन मजली इमारतीच्या उभारणीमधून आज यशस्वीपणे साकार होताना दिसत आहे.संस्थेमार्फत शिक्षणाची ही ज्ञानगंगा अशीच वाहत ठेवत अकॅडमी चे वर्ग सुरू करून तालुक्यातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
  
 अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष जयंतराव शिंपी म्हणाले, तालुक्यातील व्यंकटराव ही पहिली शाळा आहे.सर्वांच्या कार्यकर्तृत्वातून दिवसेंदिवस नावारूपाला येत आहे इथे घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहे हे फक्त आजी आणि माजी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अध्यापन सहयोगातूनच. या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे म्हणून शासनाचा कोणताही निधी नसतानाही तीन मजली इमारत बांधून पूर्ण केली आहे. कार्यक्रमास उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, सुनील देसाई, सचिन शिंपी,पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील, के.जी पटेकर,विक्रम पटेकर, विश्वास जाधव, श्री नाईक,व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव महाविद्यालय, व्यंकटराव प्राथमिक, भादवण हायस्कूल, सिरसंगी हायस्कूल देवर्डे हायस्कूल या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका  व स्टाफ उपस्थित होते.आभार पी व्ही पाटील यांनी मांनले.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...