अशोक चराटी गटाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर; आजऱ्यात मेळावा
आजरा, वृत्तसेवा :
आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा अण्णाभाऊ आजरा शेतकरी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पार पडला. या मेळाव्यात कागल विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अशोक चराटी यांच्या पाठीब्यांमुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले असे सांगितले तर अशोक चराटी म्हणाले, मंत्री मुश्रीफ हे सहाव्या वेळी उच्चांकी मताने निवडून येणार आहेत .
स्वागत व प्रास्ताविक करताना जनता शिक्षण संस्था संचालक के. व्ही. येसणे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विकासकामांबरोबरच सर्वसामान्य लोकांसाठी वैयक्तिक लाभाचे केलेले काम राज्यात आदर्शवत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अशोक चराटी यांच्या पाठिंब्याने 10 हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. काहींचा विरोध डावलून चराटी यांना आजरा साखर कारखान्याचे चेअरमन केले. या विधानसभा निवडणुकीसाठी सहकार्य करत असल्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान देण्यात येईल. गावागावांमध्ये ज्या कार्यकर्त्यांच्या मध्ये कटूता निर्माण झाली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करून विकासभिमुख काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. संकटांच्या वेळी चराटी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला पाठिंबा आयुष्यभरासाठी लक्षात राहील. अशोक चराटी यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशोक चराटी म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होतो पण कामाच्या बाबतीत मंत्री मुश्रीफ यांच्यासारखा नेता होणे नाही. युतीचा धर्म पाळत मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी राहणार. मंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला ओटीत घ्यावे. मागील चुका सुधारण्यासाठी सारेजण मिळून प्रयत्न करूया. आगामी काळात आमच्या कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेऊन करावे. आजरा बँकेचे संचालक विलास नाईक म्हणाले, मागील चुका टाळून भविष्यात एकत्र काम करणार आहोत. चराटी गटाच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. भाजपाचे तालुका सरचिटणीस अतिशकुमार देसाई म्हणाले, अशोक अण्णा चराटी यांचा सगळ्यांनाच पाठिंबा हवा आहे, पण अशोक अण्णांना सन्मान देण्याची ही गरज आहे. आगामी काळात विधानपरिषद किंवा महामंडळावर त्यांना संधी देण्यात यावी. प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, विजयकुमार पाटील, जी. एम. पाटील, दशरथ अमृते, सचिन पावले, अनिकेत कवळेकर, प्रकाश कोंडुसकर, संदीप पाटील, सौरभ नाईक, शामराव चौगुले यांच्यासह उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.
=========================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा
घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास....
आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
संपर्क : 9765903651 / 7558675252 (प्रवीण सुतार)
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================
No comments:
Post a Comment