Friday, October 25, 2024

अशोक चराटी गटाचा आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा जाहीर; आजऱ्यात मेळावा

अशोक चराटी गटाचा आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा जाहीर; आजऱ्यात मेळावा  
आजरा, वृत्तसेवा :

आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा अण्णाभाऊ आजरा शेतकरी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पार पडला. या मेळाव्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी चराटी गटाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यात येईल असे सांगितले तर अशोक चराटी यांनी आबिटकर यांची आमदारकीची हॅट्रिक पूर्ण होणार असून आगामी काळात ते नामदार होतील असे सांगितले.
 स्वागत व प्रास्ताविक करताना जनता शिक्षण संस्था संचालक विजयकुमार पाटील म्हणाले, गेली दहा वर्ष अशोक चराटी ताकतीने आमदार आबिटकरांसोबत आहेत. येत्या निवडणुकीमध्ये चराटी गटाच्या माध्यमातून आमदार आबिटकर यांना आजरा जिल्हा परिषद मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळेल. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, नेहमीच अशोक अण्णा चराटी यांची स्पष्टपणे भूमिका असते. चराटी यांची स्पष्ट भूमिका सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी असते. सध्या काही प्रमाणात मतभेद झाले, पण मनभेद झाले नाहीत. त्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील उच्चांकी मताधिक्याची परंपरा कायम राहणार आहे. राज्यात महायुतीला चांगले वातावरण आहे. गेल्या सहा महिन्यात लोकहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. बुद्धिभेद व मनभेद करण्याचे काम विरोधक करत आहेत हे सगळे मोडून काढण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाचे मन जपण्याचे काम करून प्रत्येक माणसाला आपल्याबरोबर घेऊन काम करूया असे त्यांनी सांगितले. अशोक चराटी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार आबिटकर यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय जनता पार्टीत काम करत असल्यामुळे वरिष्ठांचा निर्णय मान्य करून युती धर्म पाळणार आहे. मतदार संघामध्ये चराटी गटाची निर्णायक ताकद असल्यामुळे चराटी गटाला सोबत घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण आमदार आबिटकर हे नेहमीच सर्वसामान्यांच्या साठी काम करत असल्यामुळे तसेच युतीधर्म म्हणून महायुती बरोबर राहणार आहे. आमदार आबिटकर यांनी आजरा शहरासाठी 100 कोटींचा निधी दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येऊन आमदार आबिटकर हे मंत्री व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. आजरा बँकेचे संचालक विलास नाईक म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मध्ये काही मतभेद होते, पण ते आता दूर झाले आहेत. आजरा जिल्हा परिषद मतदार संघात अण्णा गट व आमदार गट वेगळा नाही. आगामी काळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व कार्यकर्त्यांचा मान राखून आमदार आबिटकर यांनी काम करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर,  माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, गोविंद गुरव जी. एम. पाटील, दशरथ अमृते, राजू पोतनीस,  सरपंच धनंजय पाटील, लहू वाकर, डॉ. संदीप देशपांडे, समीर पारदे, पांडुरंग लोंढे, योगेश पाटील यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले. 
=========================
जाहिरात....
शिवन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आजरा 
 घरापासून घरापर्यंतचा सुखकर प्रवास.... 
आमच्याकडे 7 सीटर, 4 सीटर आरामदायी एसी/ नॉन एसी कार भाड्याने मिळतील.
बदली ड्रायव्हर मिळतील.
 संपर्क : 9765903651 /  7558675252 (प्रवीण सुतार)
======================
जाहिरात....
दिवाळीच्या रेडिमेड फराळासाठी आजरेकरांची पहिली पसंदी....
शंकर बेकर्स अँड स्वीट,
छ. संभाजी चौक, आजरा.
संपर्क : 9850372737
=====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...