रामलिंग सेवा संस्था मेढेवाडीला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
आजरा वृत्तसेवा :
रामलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित मेढेवाडी (ता. आजरा) या संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या संचालकांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आजरा तालुक्याच्या सहकाराच्या लौकिकास साजेसे काम संस्थेने करावे, असे सहाय्यक निबंधक येझरे यांनी सांगितले. नवीन नोंदणीकृत झालेल्या रामलिंग सेवा संस्थेच्या पाठीशी जिल्हा बँक ठामपणे उभी आहे असा विश्वास जिल्हा बँक संचालक देसाई यांनी व्यक्त केला. संस्थेच्या मंजुरीसाठी जिल्हा बँक संचालक देसाई, अमर पाटील, संदेश पाटील यांनी पाठपुरावा केला. यावेळी अध्यक्ष नानासो दिनकर पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर गुंडू दळवी, संचालक मधुकर जिवबा पाटील, पुंडलिक बाळू पाटील, श्रावण दतू पाटील, मसाजी धोडीबा दळवी, विष्णू बाळकु कांबळे, शामराव सखोबा गुरव, संचालिका श्रीमती मंगल महादेव पाटील, शेवंता रामचंद्र शेटगे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment