आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरुच आहे. शुक्रवारी दिवसभरात ४७ जणांचा कोरोनाचा अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. भादवण मधील २६ वर्षीय पुरुष, उत्तूर येथील ५६ वर्षीय स्त्री तर मडिलगे येथील ६४ वर्षीय पुरुषाचा मयत झालेल्यांमध्ये समावेश आहे. आज दिवसभरात आजरा ७, बहिरेवाडी२, महागोंड ११, कर्पेवाडी ४, उत्तूर ५, चव्हाणवाडी २, येमेकोंड २, भादवण ३, मडिलगे४, कोवाडे, पेरणोली, मुरुडे, गणेशवाडी, शेळप, वेळवट्टी, देवर्डे प्रत्येकी १ असे एकूण ४७ जण पाॅझीटीव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ३१ पुरुष तर १६ स्त्रीयांचा समावेश आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment