आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुक्याचे कोरोनाचे मीटर दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे तालुकावासियांसह प्रशासनाच्याही चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात तालुक्यात तब्बल ६० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे भादवण गावात तब्बल २६ नवे रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यां मध्ये महागोंड येथील ५१ वर्षीय पुरुष, लाटगाव येथील ७० वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये कानोली आठ, कागिणवाडी एक, आवंडी दोन, रवळनाथ कॉलनी आजरा एक, मडिलगे दोन, उत्तूर पाच, मुमेवाडी एक, होन्याळी एक, बेलेवाडी एक, सुळे एक, सरोळी तीन, चव्हाणवाडी चार, देवर्डे माद्याळ चार तर भादवन सव्वीस असे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २४ पुरुष तर ३६ स्त्रीयांचा समावेश आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment