Friday, January 1, 2021

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअरचे पत्रकार पुरस्कार जाहीर; विकास सुतारही मानकरी


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सन २०२० सालचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये आजरा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक महासत्ताचे आजरा तालुका प्रतिनिधी व विकास न्यूजचे संपादक विकास सुतार यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवार (दि. १० जानेवारी) रोजी घोडावत कॉलेज अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व उद्योगपती संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

पुरस्कार विजेत्यामध्ये चंद्रकांत मिठारी (दै. महासत्ता व्यवस्थापक) यांना जीवन गौरव पुरस्कार, राजू पाटील (दैनिक पुढारी) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मिडिया पुरस्कार, विजय केसरकर (एबीपी माझा) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया,  दगडू माने (दैनिक पुण्यनगरी) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार व  निवास कांबळे यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

  
 याशिवाय तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पुढीलप्रमाणे - चंदगड :  लक्ष्‍मण व्हन्याळकर (तरुण भारत), आजरा : विकास सुतार (महासत्ता), गडहिंग्लज : गणेश  बुरुड (सकाळ), भुदरगड : शैलेंद्र उळेगड्डी (पुण्यनगरी), राधानगरी : रवींद्र पाटील (पुढारी), शाहुवाडी : श्रीमंत लष्कर (पुढारी), करवीर दक्षिण विभाग : राम पाटील (एस न्यूज), करवीर उत्तर विभाग : सतीश पाटील (तरुण भारत), हातकणंगले पश्चिम विभाग : संतोष सणगर (तरुण भारत), हातकणंगले पूर्व विभाग : सुहास जाधव (लोकमत), पन्हाळा पश्चिम विभाग : धनाजी पाटील (सकाळ), पन्हाळा पूर्व विभाग : संजय  पाटील (सकाळ), कागल मुरगूड विभाग : प्रकाश  तिराळे (दै.सकाळ), कागल विभाग : सागर लोहार (तरुण भारत), शिरोळ : निनाद मिरजे (पुण्यनगरी), हातकणंगले दक्षिण विभाग : संजय  साळुंखे (पुढारी) 


कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीस संस्थापक  अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, अॅड. प्रशांत पाटील, प्रा.भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रा.रवींद्र पाटील, अतुल मंडपे, सुरेश कांबरे, भाऊसाहेब सकट, विवेक स्वामी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...