Tuesday, January 12, 2021

महागाव येथे भारत सरकार कडून इनोव्हेशन रिसर्च सेंटरला मंजूरी; विद्यार्थ्यांच्या कल्पनेला मिळणार बळ


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलीटेक्नीकला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयने (एमएचआरडी) संशोधन केंद्रास नुकताच मंजूरी दिली असून हा नाविण्य उपक्रम पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव येथील पाँलिटेक्निकला मान्यता दिली  असल्याची माहिती संस्थाध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण यानी  पत्रकाराना दिली.

यावेळी प्राचार्य डाॕ संजय दाभोळे यांनी स्वागत करुन इनोव्हेशन रिसर्च  सेंटर विषयी अधिक माहिती देताना सांगितले, उच्च शिक्षण संस्था मधील ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये  नावीन्य पूर्ण प्रोजेक्ट व आयडिया जोपासण्यासाठी ‘एमएचआरडी’ने इनोव्हेशन सेलची स्थापना केली असून याचा  प्राथमिक उद्देश ग्रामीण भागातील  युवा विद्यार्थ्यांना नवीन कल्पनांसह संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करणे, आणि त्यांचे स्टार्टअप मध्ये  रूपांतर करणे हा आहे. ज्या अन्वये संस्थेत नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे. या माध्यमातून कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण स्टार्टअप  इको सिस्टीमही  होणार आहे.


यावेळी डाॕ. दाभोळे यांनी आयआयसीचे मुख्य उदिष्टामध्ये एक व्हायब्रंट लोकल इनोव्हेशन इकोसिस्टम साठी संस्थेमध्ये स्टार्ट-अप समर्थन करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे अचिव्हमेंट्स फ्रेमवर्कवरील अटल रँकिंगसाठी संस्था तयार करणे. विद्यार्थ्यांच्या आयडियाचा आढावा घेवून कल्पनांच्या प्री- इनक्युबेशनसाठी फंक्शनल  इकोसिस्टम स्थापित करुन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगली संज्ञानात्मक क्षमता विकसित करणे. आयआयसीने  ठरवलेल्या विविध नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता संबंधित उपक्रमांचे आयोजन करणे. विद्यार्थ्यांच्या नवकल्पना ओळखून गौरवासह यशोगाथा तयार करणे. उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्यासमवेत सामायिक  नियतकालिक कार्यशाळा, व्याख्यान,परीसंवाद आयोजित करून नवोदितांसाठी मार्गदर्शक ब्रीझ  तयार करणे. राष्ट्रीय उद्योजकता विकास संस्था असलेले नेटवर्क संस्थेच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांद्वारे केलेल्या अभिनव प्रकल्पांना हायलाईट करणे. इनोव्हेशन पोर्टल तयार करणे. उद्योगांच्या सहभागासह हॅकॅथॉन, आयडिया  स्पर्धा, लघु-आव्हाने इ. आयोजित करणे हा या संशोधन केंद्राचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे सांगितले. तरी शासनाच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाचा लाभ कोल्हापूर सह परिसरातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन करण्यात आला आहे .

 पाँलिटेक्निकला मिळालेली पुरस्कार व मानाकंन :-

*भारती एकता नवी दिल्ली कडून भारत शिरोमणी अॕवाॕर्ड 

*नाॕलेज रिव्ह्यू नुसार महाराष्ट्रात टाॕप टेन पाँलिटेक्निक 

*AICTE कडून  सिल्व्हर रॕकिंग 

*नँशनल बोर्ड आँफ अॕक्रिडेशन कडून NBA

* MSBTE येथील सर्व विद्याशाखेला सलग आठ वर्ष सर्वोत्कृष्ट मानाकंन

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......

Tuesday, January 5, 2021

महागावात 'एस.जी.एम. डायग्नोस्टिक' सेंटरचे उद्घाटन; रेशनकार्ड धारकानाही मिळणार अल्प दरातील सुविधा


महागाव (प्रतिनिधी) :

महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने सुसज्ज व स्वतंत्र इमारतीत अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटरची सुरवात केली. नुकताच या सेंटरचे  उद्घाटन संस्थाध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण याच्या हस्ते करण्यात आले. येथे तपासणी साठी येणाऱ्या पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकाना संस्थास्तरावर अल्प दरात तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्नाला माफक दरात उच्च दर्जाचे चाचण्या करण्यासाठी सोय उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. 

या सेंटरमधून जी. ई. ॲडव्हान्स 16/32 स्लाईस द्वारे  सी. टी. स्कॅन, कोलोनोस्कोपी, कलरडॉपलर, काॕल्पोस्कोपी, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, डिजीटल एक्सरे, इंडस्कोपी, अद्ययावत पॕथॉलॉजी लॕबची सुविधा मिळणार आहे. यासाठी चोवीस तास अनुभवी स्टाफ टेक्निशियन कार्यरत असणार आहे. सामान्य रुग्नालाही आधार देऊन संस्थास्तरावर केशरी व पिवळ्या रेशनकार्डवर अल्प दरात उच्च दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध असल्याने या सुविधाचा लाभ या विभागातील रुग्नानी घ्यावा असे आवाहन डाॕ. यशवंत चव्हाण यानी केला आहे .

उद्घाटन प्रसंगी ॲड. आण्णासाहेब चव्हाण, डाॕ. यशवंत चव्हाण, डाॕ. संजय चव्हाण, डाॕ. प्रतिभा चव्हाण, डाॕ. सुरेखा चव्हाण, सचिव अॕड. बाळासाहेब चव्हाण, प्रा. अजिंक्य चव्हाण व इतर डाॕक्टर तसेच कर्मचारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.......

Monday, January 4, 2021

सावधान; सॅनिटायझर घातक ठरु शकते, बोरवडेत सॅनिटायझरच्या स्फोटाने महिलेचा मृत्यू


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोरोना महामारीमुळे प्रत्येक घरात सुरक्षा म्हणून सॅनिटायझर आणले जाते. घरातील मोठ्यांबरोबरच लहान मुलेही सॅनिटायझरची बाटली हाताळत असतात. मात्र सॅनिटायझर हे ज्वलनशील आहे. त्यामुळे त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. कारण सॅनिटायझरच्या स्फोटाची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे गावात घडली आहे.

घरातील केरकचरा पेटवताना कचर्‍यात असणार्‍या सॅनिटायझर बाटलीचा स्फोट होऊन गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलेचा शनिवारी रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सौ. सुनीता धोंडिराम काशिद  (वय 40, रा. बोरवडे पैकी दत्तनगर, ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे. 

चार दिवसांपूर्वी सुनीता काशिद  घराची झाडलोट झाल्यानंतर सर्व  कचरा घराच्या बाहेर मोकळ्या जागेत पेटवत होत्या. या कचर्‍यात सॅनिटायझरची बाटलीही होती. कचरा पेटविल्यानंतर अचानक बाटलीचा स्फोट होऊन त्यातील काही सॅनिटायझर काशिद यांच्या अंगावर उडाले. त्यामुळे  कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये त्या 80 ते 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरवडे परिसरात हळहळ व्यक्‍त होत  आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Friday, January 1, 2021

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअरचे पत्रकार पुरस्कार जाहीर; विकास सुतारही मानकरी


कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सन २०२० सालचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये आजरा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दैनिक महासत्ताचे आजरा तालुका प्रतिनिधी व विकास न्यूजचे संपादक विकास सुतार यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवार (दि. १० जानेवारी) रोजी घोडावत कॉलेज अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व उद्योगपती संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

पुरस्कार विजेत्यामध्ये चंद्रकांत मिठारी (दै. महासत्ता व्यवस्थापक) यांना जीवन गौरव पुरस्कार, राजू पाटील (दैनिक पुढारी) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार प्रिंट मिडिया पुरस्कार, विजय केसरकर (एबीपी माझा) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया,  दगडू माने (दैनिक पुण्यनगरी) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार व  निवास कांबळे यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

  
 याशिवाय तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पुढीलप्रमाणे - चंदगड :  लक्ष्‍मण व्हन्याळकर (तरुण भारत), आजरा : विकास सुतार (महासत्ता), गडहिंग्लज : गणेश  बुरुड (सकाळ), भुदरगड : शैलेंद्र उळेगड्डी (पुण्यनगरी), राधानगरी : रवींद्र पाटील (पुढारी), शाहुवाडी : श्रीमंत लष्कर (पुढारी), करवीर दक्षिण विभाग : राम पाटील (एस न्यूज), करवीर उत्तर विभाग : सतीश पाटील (तरुण भारत), हातकणंगले पश्चिम विभाग : संतोष सणगर (तरुण भारत), हातकणंगले पूर्व विभाग : सुहास जाधव (लोकमत), पन्हाळा पश्चिम विभाग : धनाजी पाटील (सकाळ), पन्हाळा पूर्व विभाग : संजय  पाटील (सकाळ), कागल मुरगूड विभाग : प्रकाश  तिराळे (दै.सकाळ), कागल विभाग : सागर लोहार (तरुण भारत), शिरोळ : निनाद मिरजे (पुण्यनगरी), हातकणंगले दक्षिण विभाग : संजय  साळुंखे (पुढारी) 


कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीस संस्थापक  अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, अॅड. प्रशांत पाटील, प्रा.भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, प्रा.रवींद्र पाटील, अतुल मंडपे, सुरेश कांबरे, भाऊसाहेब सकट, विवेक स्वामी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...