Thursday, December 18, 2025

किणेच्या लक्ष्मी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जयवंत मसणू सुतार यांची निवड

आजरा. विकास न्यूज नेटवर्क :
लक्ष्मी वि. का. स. (विकास )सेवा संस्था मर्यादित किणे (ता. आजरा) या संस्थेच्या चेअरमन पदी जयवंत मसणू सुतार यांची निवड झाली आहे. चेअरमन निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी पी. व्ही. फडणीस (सहाय्यक निबंधक कार्यालय आजरा) हे होते.

चेअरमन पदासाठी जयवंत सुतार यांचे नाव मनोहर दत्तू पताडे यांनी सुचविले. त्यास गोविंदा सुभाना वांजोळे यानी अनुमोदन दिले. यावेळी निवड सभेचे अध्यक्ष व नूतन चेअरमन याचा सत्कार करणेत आला. यावेळी व्हा. चेअरमन आप्पा गुरव, संचालक आनंदा कामत, श्रीकांत शेंदरकर, मारूती गिलबिले, चाळू केसरकर, गंगाराम पाटील, जनाबाई गिलबिले, सुशाबाई तुपट उपस्थित होते. आभार सचिव संजय घाटगे यांनी मानले.
=======================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...