आजरा विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार हे जाहीर केले होते. मात्र मतमोजणीच्या काही तास अगोदर मतमोजणी तब्बल 18 दिवस पुढे ढकलण्यात आली. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असं जाहीर करण्यात आले. यामुळे आजरा शहरवासीयांना मतमोजणीसाठी 18 दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. ही प्रतीक्षा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता साऱ्यांचीच उत्कंठा वाढली आहे. तसेच राजकीय नेते व कार्यकर्त्यांची धडधड देखील वाढलेली आहे.
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीच्या प्रचार दरम्यान सर्वच ठिकाणी मोठी चुरस पहावयास मिळाली. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होऊन साम, दाम, दंड, भेद नीतीचा देखील वापर झाला. थेट नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदाच्या जागांसाठी मंगळवारी 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात सरासरी 77.86 टक्के मतदान झाले. एकूण 14 हजार 686 मतदारांपैकी 11 हजार 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आजरेकरांनी नेमका कुणाला कौल दिला आहे हे मतपेटीत बंद आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात नेमके कोण जाणार, याची प्रतीक्षा गेले 18 दिवस शहरवासीयांना आहे. ती प्रतीक्षा रविवारी सकाळी 10 वाजता संपुष्टात येणार आहे.
रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय आजरा येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीची प्रशासकीय पातळीवरची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी दिली. एकूण दोन फेऱ्यात दहा टेबलावर ही मतमोजणी होणार आहे. यासाठी 55 कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 8 या प्रभागातील 1 ते 9 मतदान केंद्रावरची मतमोजणी पूर्ण होणार आहे. या फेरीत 1 ते 7 प्रभागातील प्रत्येकी एक तर प्रभाग आठ मधील दोन केंद्रावरची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक 9 ते प्रभाग क्रमांक 17 या प्रभागातील 10 ते 19 मतदान केंद्रावरची मतमोजणी पूर्ण होणार आहे. या फेरीत प्रभाग 9 मधील दोन तर प्रभाग 10 ते 17 मधील प्रत्येकी एका केंद्रावरची मतमोजणी होणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार आहे.
=============================
Subscribe to:
Post Comments (Atom)
कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment