Saturday, November 15, 2025

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद

अहिल्यानगर, न्यूज नेटवर्क :
राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी त्यांनी आस्थेवाईकपणे संवाद साधला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज बांगर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाले आहे. हे केंद्र तातडीने कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येत असून केंद्रासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला मान्यता देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच या प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी नूतन इमारतीतील तपासणी कक्ष, प्रसूती कक्ष, औषध वितरण विभाग, प्रयोगशाळा, लसीकरण कक्ष, आपत्कालीन सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्ण प्रतीक्षालयातील बसण्याची सोय यांची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेतली.

राळेगणसिद्धी येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली.
=========================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...