Saturday, November 15, 2025

आजरा नगराध्यक्ष पदासाठी अबूताहेर तकीलदार यांचा अर्ज दाखल

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अबूताहेर तकीलदार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, कारखाना संचालक अनिल फडके, रणजित देसाई व संजय भाऊ सावंत उपस्थित होते.
    
अबूताहेर तकीलदार यांनी राजकीय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील राजकारणात त्यांची पकड आहे. यामुळे वरिष्ठ नेत्यांची जवळीकता आहे. राजकारणाची गणिते मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. जातपात न पहाता सर्वांसाठी समाजकारण करण्यात त्यांना आवड आहे यामुळेच त्यांनी अनेक शिखर संस्थांमध्ये काम केले आहे. अन्याया विरुद्ध बेधडक बोलणारी व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत. व्यवसायातून अनेक धर्मीयांचा संबंध येतो. ते इतर धर्मीयांच्या धार्मिक असो वा वैयक्तिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. अभ्यासू वृत्तीमुळे प्रशासना समोर प्रश्न मांडून निर्गत करता येते.
   
आजरा पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. आजरा ग्रामपंचायतीचे ते सदस्यही होते, त्यावेळी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचा अनुभव व कामाची पद्धत पहाता त्यांना आजरा साखर कारखान्याचे संचालक,आजरा तालुका संघ या शिखर संस्थावर काम करण्याची संधी मिळाली. आजही अबूताहेर तकीलदार गडहिंग्लज बाजार समितीचे विद्यमान सदस्य आहेत. शहीद अब्दुल हमीद सेवा संस्थेचे चेअरमन आहेत.प्रशासन हाताळण्याचा अनुभव आहे. आजरा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ते इच्छुक आहेत.या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे.
======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...