Friday, November 14, 2025

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण

कोल्‍हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ७२ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या १३६ व्या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले.

वेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “सहकारामुळेच ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना आधार मिळाला आहे. गोकुळने नेहमीच सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पुढेही सेवा, सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकाराची ताकद वाढवत राहू.” कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. व जिल्‍ह्यातील सर्व सहकारी दूध संस्‍था, दूध उत्‍पादक, अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्‍ताह व बालदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी स्वागत प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रकाश साळुंखे यांनी मानले. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके,  कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन  व्‍यवस्‍थापक एस. व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, डॉ. प्रकाश दळवी, महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर संघाचे इतर अधिकारी, महिला स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
=============================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...