Friday, November 14, 2025

आजरा नगरपंचायत निवडणूक : शुक्रवारी नगराध्यक्षसाठी तीन तर नगरसेवकसाठी तेवीस अर्ज दाखल

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी तेवीस असे एकूण 26 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकून 33 अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी संजय सावंत, संभाजी पाटील, मंजूर मुजावर यांनी तर नगरसेवक पदासाठी संभाजी पाटील, संजय इंगळे (प्रभाग दोन), सुमैय्या खेडेकर (प्रभाग तीन), जावेद पठाण (प्रभाग चार), निशाद चाँद (प्रभाग पाच), शाहीन तकीलदार, नूरजहां तकीलदार (प्रभाग सहा), कलाबाई कांबळे (प्रभाग सात), असिफ सोनेखान (प्रभाग आठ), रेशमा बुड्डेखान, रहिताझबी बुड्डेखान (प्रभाग नऊ), सनाऊला चाँद, निसार लाडजी (प्रभाग दहा), दिलशाद पटेल, दत्तराज देशपांडे (प्रभाग बारा), पांडुरंग सुतार, रवींद्र पारपोलकर (प्रभाग तेरा), परशराम बामणे (प्रभाग पंधरा), रेशमा खलिफ (प्रभाग सोळा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...