Thursday, November 6, 2025

कानोलीच्या उपसरपंच पदी चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कानोली-हारूर (ता. आजरा) ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी चंद्रकांत पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील होत्या.

कानोली-हारूरचे उपसरपंच प्रा. स्वप्निल आर्दाळकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर जेष्ठ सदस्य चंद्रकांत पांडुरंग पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.  यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन निवड केली. यावेळी सदस्य सुधीरकुमार पाटील,  प्रा. स्वप्निल आर्दाळकर, अनिल पां. पाटील, सारिका शहाजी भोसले, शुभांगी अशोक पाटील, आरती सूर्यकांत देसाई, दिपाली दिपक सुतार, मायादेवी विठ्ठल लोहार, ग्रामअधिकारी स्नेहदीप सरदेसाई, गवळी साहेब, बाजीराव पाटील, सुभाष पाटील, दिपक देसाई, प्रकाश पाटील, गोपाळ भोगण, शहाजी भोसले, सूर्यकांत मुरुकटे, दिपक सुतार, जैमलसिंह देसाई उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळेत नवीन मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेल्या सुरेखा सुभाष घाटगे यांचेही स्वागत आणि सत्कार करण्यात आला. आभार सुभाष पाटील यांनी मानले.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...