Thursday, November 6, 2025

मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाचा आरसा आहे : आय. के. पाटील, आजरा महाविद्यालय आणि नवनाट्य मंडळ यांच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मराठी रंगभूमीचे वेगळेपण तिच्या सांस्कृतिक वारसा, संवादशैली, सामाजिक भान, विषय-विविधता आणि आधुनिकतेमध्ये आहे. या रंगभूमीने ऐतिहासिक, पौराणिक आणि विनोदी नाटकांच्या जोडीला सामाजिक समस्यांवर आधारित नाटकांनाही प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे ती महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाचा आरसा बनली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आय. के. पाटील यांनी येथे केले. आजरा महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि नवनाट्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा महाविद्यालयात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आय. के. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.

पाटील पुढे म्हणाले की, विष्णुदास भावे यांनी दि. ५ नोव्हेंबर १८५३ मध्ये 'सीता स्वयंवर' या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीची सुरुवात केली. हा वारसा घेऊन ही रंगभूमी विकसित झाली. सुरुवातीला ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांवर या रंगभूमीचा भर होता, तर नंतर सामाजिक, विनोदी आणि गंभीर विषयांवरील नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले. आजही मराठी रंगभूमीची परंपरा ही भारतातील सर्वात जुनी आणि समृद्ध नाट्य परंपरा मनाली जाते. यावेळी श्रुती कांबळे, संचिता तरडेकर, निदा इंचनाळकर, विक्रांत सावंत, विवेक कोंडुस्कर, अथर्व मोहिते यांचीदेखील भाषणे झाली. यावेळी कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, रुपेश डांग, अनिकेत कांबळे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, अरमान दड्डीकर, समृद्धी तांबेकर, संदीप देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम राणे याने केले. सूत्रसंचालन सुप्रिया घुरे हिने तर मिथुन कांबळे याने उपस्थितांचे आभार मानले.
=============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...