Friday, November 7, 2025

आजरा तालुका माध्यमिक शाळा सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी तांबेकर, व्हा. चेअरमनपदी संदीप कुंभार

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा तालुका माध्यमिक शाळा सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी मारुती तांबेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी संदीप हरी कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी पी. व्ही. फडणीस होते.

चेअरमन पदासाठी तांबेकर यांचे नाव रवींद्र पाटील यांनी सुचविले, त्यास अनिल देसाई यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी कुंभार यांचे नाव अनिल देसाई यांनी सुचवले. त्यास शिवाजी तांबेकर यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नूतन चेअरमन तांबेकर व नूतन व्हा. चेअरमन कुंभार यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली. तसेच नूतन चेअरमन तांबेकर व नूतन व्हा. चेअरमन कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सुभाष सावंत, अनिल देसाई, राजेंद्र कुंभार, रवींद्र पाटील, महादेव पाटील, शिवदास मुंडे, इंद्रजीत बंदसोडे, कल्पना खामकर, सुमित्रा ढेकळे, मॅनेजर पंकज देसाई, मोहन डोणकर उपस्थित होते.
===============

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...