कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
भारतीय संविधानाने नागरिकांना काही मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. या अधिकार व हक्कांबाबत नागरिकांनी माहिती घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन व संविधान समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकीयेन,सुषमा सातपुते अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, संशोधन अधिकारी संभाजी पवार, समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान जन जागृतीच्या उद्देशाने संपूर्ण वर्षभर जिल्हयात विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंगाराम कांबळे स्मारक, सीपीआर मार्गे दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ वरील सर्व महामानवांना अभिवादन करुन या रॅलीची सांगता करण्यात आली.
======================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment