Sunday, November 23, 2025

आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : शाहीन तकीलदार (अपक्ष, प्रभाग सहा)

आजरा नगरपंचायत निवडणूक विशेष : माझा प्रभाग, माझी जबाबदारी : शाहीन तकीलदार (अपक्ष, प्रभाग सहा)
आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रभाग सहाच्या विकासाचे व्हिजन घेऊन शाहीन फरहान तकीलदार या अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शाहीन तकीलदार यांनी विकास न्यूजशी खास संवाद साधला...

प्रभाग सहाच्या अपक्ष उमेदवार शाहीन तकीलदार म्हणाल्या, आपण स्वतः उच्चशिक्षित व सुसंस्कृत घराण्यातील महिला आहे. आजरा शहराला नगरपंचायत होऊन सात वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शहराचा तसेच प्रभाग 6 चा विकास खुंटलेला आहे. यातून अस्वस्थ होऊन प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सासरे रियाज तकीलदार, पती फरहान तकीलदार व कुटुंबियांनी पाठिंबा दिला. यातूनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. प्रभाग सहा मध्ये सिद्धिविनायक कॉलनी, एकता कॉलनी, मुल्ला कॉलनी, खेडेकर कॉलनी तसेच शहरातील आंबोली रस्त्याकडील काही भागाचा समावेश होतो. मात्र या भागाचा विकास झालेला नाही. हा भाग दुर्लक्षित राहिला आहे. आमच्या खेडेकर कॉलनीत तर अगदी रस्ता आणि पाणी या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. याचा त्रास महिला वर्गाला व कुटुंबाला सहन करावा लागत आहे. हे सारे चित्र बदलण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.

शाहीन तकीलदार पुढे म्हणाल्या, खेडेकर कॉलनीत साधारण 30 पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र यांचा समावेश अजूनही शहराच्या गावठाण मध्ये करण्यात आलेला नाही. याचा त्रास नागरिकांना होत आहे. नवीन पाणी योजनेची पाण्याची टाकी या कॉलनीतच उभारले आहे. मात्र अद्यापही पाण्याचा पुरवठा होत नाही. गेल्या अनेक वर्ष भागातील नागरिक स्वखर्चाने पाण्याचा टँकर आणून त्याचा वापर करत आहेत. रस्ते व गटारी यांचा तर अजून पत्ताच नाही. यामुळे आरोग्याचे प्रश्न आ वासून उभे आहेत. प्रभागातील इतर भागात देखील रस्ते व गटारीचे प्रश्न कायम आहेत. हे चित्र मला बदलायचे आहे. आगामी काळात प्रभागातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मला मिळवून द्यायचे आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळात पक्के रस्ते व गटर्स नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा माझा मानस आहे. सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. मी उच्चशिक्षित असल्यामुळे तसेच महिला असल्यामुळे मला प्रभागातील अनेक प्रश्नांची जाण आहे. त्याची सोडवणूक नगरपंचायतीच्या माध्यमातून होण्यासाठी मी नगरसेवक होऊन त्या प्रश्नांची मांडणी नगरपंचायतीच्या सभागृहात करणार आहे. यासाठी आजरा नगरपंचायत प्रभाग सहा मधील सर्व सन्माननीय मतदार बंधू-भगिनींनी मला विजयी करावे व आपली सेवा करण्याची संधी द्यावी असेही शाहीन तकिलदार म्हणाल्या.
=============================

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...