आजरा शहराच्या विकासासाठी नेहमीच काम केले आहे. यापुढेही आजरा शहराच्या विकासाचा ध्यास कायम राहणार आहे. माझ्यासह ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची विकासासाठीची धडाडी साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आजरा शहरातील जनता माझ्या पाठीशी ठाम उभे असल्याने ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास तररणी आघाडीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी व्यक्त केला. यावेळी आबूताहेर तकीलदार, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, अश्कर लष्करे, सना चाँद, महंमदसाब तकीलदार यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध गटांनी ताराराणी आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
स्वागत विलास नाईक यांनी केले. अशोकअण्णा चराटी पुढे म्हणाले, जुन्या भाजपला सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका होती. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी यात खोडा घातला. तालुक्यातील तीनही आमदार ताराराणी आघाडी सोबत आहेत. आत्तापर्यंत शहराचा विकास झाला आहे, आगामी काळात आणखीन विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत नऊ-दहा प्रभागांमध्ये प्रचार दौरा पूर्ण झाला आहे. सर्वच प्रभागात ताराराणी आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक केवळ विजयी होणार नाहीत तर त्यांच्या मतांच्या जवळपास देखील विरोधी उमेदवारांना मतदान होणार नाही. गतसभागृहातील पाच वर्षात सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकत्र बसून निर्णय घेतले आहेत. मग मी हुकूमशहा असल्याचा साक्षात्कार आत्ताच कसा झाला? एखादा मोठा उद्योग शहरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल. आतापर्यंत सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. मात्र प्रशासकीय कारकिर्दीतील विकास कामांच्या दीर्घायबाबत ही आम्हालाच टार्गेट केले जाते हे चुकीचे आहे. सगळ्यांना सोबत घेऊन पॅनेल केले आहे, पुढील काळात सगळ्यांना सोबत घेऊन आजरा शहराचा विकास साधला जाणार आहे. आबूताहेर तकिलदार म्हणाले, समाजासाठी काम करण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होतो मात्र मनाच्या विरोधात काही गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेत अशोक अण्णांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी जनार्दन टोपले, विजय पाटील, ओमकार माद्याळकर, अष्कर लष्करे, सना चाँद, आकाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अनिल देशपांडे, अनिकेत चराटी, सिकंदर दरवाजकर, दशरथ अमृते, डॉ. इंद्रजीत देसाई यांच्यासह ताराराणी आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते.
=========================
यावेळी जनार्दन टोपले, विजय पाटील, ओमकार माद्याळकर, अष्कर लष्करे, सना चाँद, आकाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अनिल देशपांडे, अनिकेत चराटी, सिकंदर दरवाजकर, दशरथ अमृते, डॉ. इंद्रजीत देसाई यांच्यासह ताराराणी आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते.
=========================
No comments:
Post a Comment