Tuesday, November 18, 2025

आजरा नगरपंचायत : नगराध्यक्ष पदाचे दोन तर नगरसेवक पदाचे दहा अर्ज अपात्र

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 18 तर 17 प्रभागातील 17 नगरसेवक पदासाठी 135 अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी मंगळवारी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे 2 तर नगरसेवक पदाचे 10 अर्ज अपात्र ठरले. बहुतांश अर्ज पक्षाचे एबी फॉर्म नसल्यामुळे अपात्र ठरले असले तरी संबंधित उमेदवारांचे अपक्ष अर्ज कायम राहिले आहेत. विशेष म्हणजे आजऱ्यामध्ये कोणीही कोणाच्याही अर्जावर आक्षेप घेतला नाही. भाजप व शिवसेना शिंदे गट पुरस्कृत ताराराणी आघाडी जाहीर झाली आहे. मात्र अद्यापही विरोधी आघाडीला मूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही. अर्ज माघारीसाठी शुक्रवार दि. 21 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसात आणखी काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्ष पदासाठी संभाजी पाटील (शिवसेना ठाकरे गट) व मंजूर मुजावर (काँग्रेस) यांनी पक्षाचे एबी फॉर्म जोडले नसल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र मंजूर मुजावर यांचा अपक्ष अर्ज आहे. नगराध्यक्ष पदासाठी 16 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये 8 तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये 5 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग तीन मध्ये रहिमतबी खेडेकर यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज अपात्र ठरला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अर्ज पात्र ठरला आहे. या प्रभागात 6 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये बाकीयु खेडेकर यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात 8 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक पाच मध्ये 8, प्रभाग क्रमांक सहा मध्ये 9 तर प्रभाग क्रमांक सात मध्ये 7 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक आठ मध्ये करिष्मा शेख यांनी जात पडताळणी टोकन अर्जासोबत जोडले नसल्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरला आहे. या ठिकाणी 7 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग नऊ मध्ये 5 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग 10 मध्ये सनाउल्ला चांद व उमेद चांद या दोघांचेही अर्ज काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे अपात्र ठरले आहेत. त्यांचे अपक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या प्रभागात 13 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मध्ये वृषाली केळकर यांचा तराराणी आघाडीचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात सात अर्ज पात्र आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 8 तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये 4 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये विक्रम पटेकर यांचा काँग्रेसचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात सहा अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये 5 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये रेशमा खलिफ व नाजमीन लष्करे या दोघींचेही अर्ज काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे अपात्र ठरले आहेत. मात्र त्यांचे अपक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या प्रभागात 11 अर्ज पात्र ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सरिता गावडे यांचा काँग्रेस पक्षाचा अर्ज अपात्र ठरला आहे. या प्रभागात 8 अर्ज पात्र ठरले आहेत. नगरसेवक पदाचे एकूण 125 अर्ज पात्र ठरले आहेत. शुक्रवारच्या माघारीनंतर आजरा नगरपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
==============================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...