Monday, November 17, 2025

आजरा नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना शिंदे गट पुरस्कृत ताराराणी आघाडीचे उमेदवार जाहीर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना शिंदे गट पुरस्कृत ताराराणी आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यावेळी आघाडी प्रमुख अशोक चराटी, विलास नाईक, सुरेश डांग, विजय पाटील, रमेश कुरुणकर, आनंदा फडके, संजय चव्हाण, बाळ केसरकर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोक चराटी म्हणाले, ही आघाडी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार महादेव महाडिक, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून आकाराला आली आहे. शहरातील बहुसंख्य मुस्लिम गटांचा देखील पाठींबा आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत आम्ही शहराच्या विकासासाठी काम केले आहे. आगामी काळातही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे आमचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

ताराराणी आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्ष : अशोक काशिनाथ चराटी
प्रभाग एक : अश्विनी संजय चव्हाण
प्रभाग दोन : पूजा अश्विन डोंगरे
प्रभाग तीन : समीना वसीम खेडेकर
प्रभाग चार : रशीद महंमद पठाण
प्रभाग पाच : निशात समीर चाँद
प्रभाग सहा : अन्वी अनिरुद्ध केसरकर
प्रभाग सात : बालिका सचिन कांबळे
प्रभाग आठ : इकबाल इब्राहिम शेख
प्रभाग नऊ : यास्मिन कुदरत लतीफ
प्रभाग दहा : सिकंदर इस्माईल दरवाजकर
प्रभाग अकरा : गीता संजय सावंत
प्रभाग बारा : अनिकेत अशोक चराटी
प्रभाग तेरा : परेश कृष्णाजी पोतदार
प्रभाग चौदा : सिद्धेश विलास नाईक
प्रभाग पंधरा : शैलेश नारायण सावंत
प्रभाग सोळा : आसावरी महेश खेडेकर
प्रभाग सतरा : पूनम किरण लिचम
====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...