आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत निवडणुकीत अन्याय निवारण समिती स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉ.श्रद्धानंद ठाकूर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले. आजरा शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आघाडी करून रिंगणात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. समितीच्या कार्याच्या पोचपावती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अन्याय निवारण समितीने निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्र आघाडी केल्याने पुन्हा राजकीय समिकरणे बदलणार आहेत. या मुळे निवडणुकीत आणखीन रंग चढला आहे
यावेळी प्रा.सुधीर मुंज म्हणाले, आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने गेल्या दोन वर्षांत तळागळात काम केले आहे. पाण्याचा प्रश्न चांगला हाताळल्यामुळे आजरेकरांना टंचाई भासली नाही. प्रशासनाला वठणीवर आणत अन्याय निवारण समितीने रात्रीचा दिवस करत पाणी मिळवून दिले. वाढीव घरफाळा रोखण्यासाठी भव्य मोर्चा काढून न्याय मिळवून दिला. याशिवाय अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. आजरेकर हे विसरणार नाही.आम्ही समविचारी आघाडी बनवली आहे. जनता या आघाडीला नक्की स्विकारणार. डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, ही आघाडी निष्कलंक आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन जाणार आहे. शहराला नवा विकास देणारी नवी दिशा देणारी आघाडी आहे. शहराला रोल मॉडेल करणार. जनतेच्या आग्रहास्तव ही आघाडी रिंगणात उतरली आहे. अरुण देसाई म्हणाले, स्वैराचार व भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासकांकडे दुर्लक्ष केले आहे. निधी हा शासनाकडून येतो त्यामुळे तो आपण आणला हा कांगावा त्यांनी करु नये. त्यांची नितीमत्ता घसरत चालली आहे. सत्ताधाऱ्यांचे प्रमुखांना खूप कामे आहेत. अनेक संस्था आहेत त्यामुळे तिकडे लक्ष देण्यासाठी नगरपंचायतीतून मोकळे करुया. २७ कोटींच्या पाणी योजना मॅनेज केली आहे. ठेकेदाराची मुदत संपूनही तो अडीच वर्षे काम करत आहे. समितीने अनेक आंदोलने केली मात्र एकही नगरसेवक यावेळी प्रशासनाला जाब विचारला आले नाहीत. या पत्रकार परिषदेला परशुराम बामणे, नाथ देसाई, सुधीर कुंभार, दयानंद भुसारी, राजेंद्र चंदनवाले, गौरव देशपांडे, जावेद पठाण, रवींद्र पारपोलकर, जोतिबा आजगेकर, पांडुरंग सावरतकर, हर्षद परुळेकर, सुभाष कांबळे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment