आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीसाठी प्रचाराचा जोर वाढतच चालला आहे. यामध्ये ताराराणी आघाडीने आघाडी घेतली आहे. ताराराणी आघाडीचे प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार सिकंदर इस्माईल दरवाजकर, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार यास्मिन कुदरत लतीफ यांच्या समर्थनार्थ वाडा गल्ली, दर्गा गल्ली व मेन रोड परिसरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विकासकामांची माहिती देण्यावर उमेदवारांकडून विशेष भर देण्यात आला.
या प्रचार रॅलीमध्ये विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोसकर, वसीम दरवाजकर, शोएब दरवाजकर, मोहम्मद दरवाजकर, भरत कांबळे, बाळू कुंभार, मज्जित दरवाजकर, दाऊद दरवाजकर, कादिर दरवाजकर, नौशाद चांद, जहिद जमाल, अय्याज माणगावकर, उजेर दरवाजकर, रेहान दरवाजकर, रसूल आगा, शोकात चांद, गणी खेडेकर, अब्दुल रहीम खेडेकर, नईम मुराद, सिद्दिक माणगावकर, असिफ दरवाजकर, दानिश लतीफ, इमाम नेसरीकर, आरिप मालदार, रिजवान फकीर, इरफान मुल्ला, इजाज माणगावकर, असिफ मुल्ला, मतीन मुराद, हुरेर माणगावकर, जैद माणगावकर, जब्बार तकिलदार, हुसेन पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, तरुण वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रचार मोहीमेदरम्यान उमेदवारांसोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगतदार झाले.
ताराराणी आघाडीच्या वतीने बुधवारी सकाळी 8 वाजता प्रभाग क्रमांक 5 व 6 मधील मदरसा कॉलनी, मुल्ला कॉलनी, एकता कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी मध्ये घर-टू-घर प्रचार राबविण्यात येणार असून कार्यकर्त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
===========================
Subscribe to:
Post Comments (Atom)
परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन
कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment