Wednesday, October 8, 2025

आजरा नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायत आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सूळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण निश्चिती करण्यात आली. यावेळी अशोक चराटी, विलास नाईक, अनिकेत चराटी, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, बाळ केसरकर, जनार्दन टोपले, नाथ देसाई, विक्रम देसाई, संजय पाटील, विजय थोरवत, संतोष भाटले, परशराम बामणे, वैभव सावंत, अश्विन डोंगरे, निसार लाडजी, रशीद पठाण, अरिफ खेडेकर, नौशाद बुडडेखान, अभिजित फडके, अभिजित रांगणेकर, रवींद्र भाटले, श्रीकृष्ण कोगेकर, नितीन यादव, दीपक बल्लाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अनु. जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), सर्वसाधारण महिला या क्रमाने आरक्षण सोडत काढण्यात आली.


आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रभागनिहाय आरक्षण :
प्रभाग एक : सर्वसाधारण महिला
प्रभाग दोन : ओबीसी
प्रभाग तीन : ओबीसी (महिला)
प्रभाग चार : सर्वसाधारण
प्रभाग पाच : ओबीसी (महिला)
प्रभाग सहा : सर्वसाधारण महिला
प्रभाग सात : अनु. जाती महिला
प्रभाग आठ : ओबीसी
प्रभाग नऊ : ओबीसी (महिला)
प्रभाग दहा : सर्वसाधारण
प्रभाग अकरा : सर्वसाधारण महिला
प्रभाग बारा : सर्वसाधारण
प्रभाग तेरा : सर्वसाधारण
प्रभाग चौदा : सर्वसाधारण
प्रभाग पंधरा : सर्वसाधारण
प्रभाग सोळा : सर्वसाधारण महिला
प्रभाग सतरा : सर्वसाधारण महिला
======================= 

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...