भगवा रक्षक तरुण मंडळ आजरा यांच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्र उत्सवाच्या वेळी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निश्चय केला गेला होता. त्याचबरोबर आजरा व आजरा पंचक्रोशीतील नागरिकांना सुद्धा आमच्या सोबत पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी आवाहन केले होते. या आवाहनास भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. त्या माध्यमातून अन्न व वस्त्र याविषयी कमीत कमी मूलभूत गरज या पूरग्रस्तवासीयांची भागविण्यास एक छोटासा हातभार आमच्या मंडळाच्या वतीने आणि आजरावासी यांच्यावतीने मिळेल अशी आशा मंडळाचे संस्थापक संजयभाऊ सावंत यांनी व्यक्त केली. पूरग्रस्तांसाठी जमा केलेले साहित्य विदर्भातील पूरग्रस्त भागात आजऱ्याहून शनिवारी रवाना झाले. यावेळी अध्यक्ष रवींद्र तळेवाडीकर, अजित सरदेसाई, अभिजीत भातखांडे, सिद्धेश नाईक, रोहित नार्वेकर, दीपक हरणे, अतुल पाटील, परेश पोतदार, निखिल पाचवडेकर, विजय नेवरेकर, संदीप नेवरेकर, सुरज नाईक, अमित महाडिक, प्रदीप पाचवडेकर(सचिव), शेखर आजगेकरकर, प्रसाद ओतारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच यामध्ये नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा संस्था गडहिंग्लज यांच्यावतीने ही पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. याप्रसंगी आजरा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार व त्यांचा सहकारी स्टाफ उपस्थित होते. सदरची मदत भगवा रक्षक मंडळाने जमा करण्यासाठी नवरात्र उत्सव हा अतिशय अत्यल्प खर्चामध्ये आणि काटकसरीच्या स्वरूपामध्ये केला होता. याचे कारण पूरग्रस्त भागातील लोकांच्या दुःखाची जाणीव ठेवून हा कार्यक्रम अतिशय शांततेत आणि छोट्या स्वरूपात साजरा करून पूरग्रस्तवासियांसाठी मदत केली आहे.
==================
No comments:
Post a Comment