आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघामार्फत दिला जाणारा "आदर्श शिक्षक पुरस्कार 2025," वितरण कार्यक्रम मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांच्यासह कोल्हापुर जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांना पुरस्कार सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शाल, शिल्ड, सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, भगवत गीता ग्रंथ व गुलाब फुल देऊन प्रत्येक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पाचशे शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रा. बी. एस. पाटील यांनी केले. प्रा. सी. व्ही. पुंड, प्रा. सी. व्ही जाधव, प्रा. एस. व्ही. गुरबे, प्रा. पी. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.सी.एम.गायकवाड यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. मा.सुनिलकुमार लवटे यांनी 'शिक्षक टिकला पाहिजे.यासाठी संघटनेच्या पाठीशी उभा रहा, असा संदेश शिक्षकांना दिला. लवटे यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे आपणास खाजगीकरणाकडे नेणारे आहे. शिक्षकांचे अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य शिक्षक, अर्धं वेळ, सी.एच.बी.असे शिक्षकांचे प्रकार आहेत. भविष्यात सेंकदावरील शिक्षक अशी संकल्पना उदयास येईल. शिक्षणव्यवस्था ढासळत चाललेली आहे. नवीन शिक्षकांची पेन्शन सरकारने बंद केली.शिक्षकांनी भविष्यात जगायचे कसे? अश्या अनेक समस्या आज आपल्या समोर आहेत.त्यासाठी संघटना महत्वाची आहे.'
अध्यक्षीय भाषणात प्रा. एस. बी. उमाटे यांनी 'संघटनेचे महत्व विषद केले. नवीन वेतनश्रेणी, डी.एच.ई.मुळे उपप्राचार्य पदी निवड झाली. आजचे वेतन, सेवा शाश्वती, वेतन वाढ,या सर्व गोष्टी संघटनेमुळे आपणास मिळालेल्या आहेत.आपण आज अखेर शिक्षकांसाठी अनेक आंदोलने केली. भविष्यात या पेक्षा मोठी आंदोलने करावी लागणार आहेत. तरच आपले प्रश्न मार्गी लागतील. म्हणून संघटनेच्या पाठीशी उभा रहा' असे मत मांडले. आदर्श शिक्षक पुरस्कार उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांना मिळाल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ अशोक सादळे, अधीक्षक योगेश पाटील, पर्यवेक्षक प्रा मनोज पाटील व स्टाफने अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा संघाचे उपाध्यक्ष प्रा.विठ्ठल नाईक, प्रा.विजय मेटकरी, खजानिस प्रा.संग्राम पाटील, प्रा.विनायक चव्हाण, प्रा. बी. आर पाटील, प्रा. एच. बी. जवळे, प्रा. राहुल बुनाद्रे, प्रा. पी. बी. रक्ताडे, प्रा. एस. एम. निळकंठ, प्रा.सौ. रश्मी यादव उपस्थीत होते. आभार अध्यक्ष प्रा. ए. बी. बागडी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. एस. जी. जांभळे यांनी केले.
==============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment