Wednesday, October 15, 2025

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा 27 वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता.आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेत. सह. साखर साखर कारखान्याचा सन 2025-26 चा 27 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन' समारंभ कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई तसेच व्हा. चेअरमन सुभाष गणपतराव देसाई व सर्व संचालक मंडळ सदस्यांचे शुभहस्ते संपन्न झाला. तत्पूर्वी कारखान्याच्या संचालिका मनिषा रविंद्र देसाई व त्यांचे पती रविंद्र रघुनाथ देसाई यांचे शुभहस्ते विधिवत होम-हवन पूजा पार पडली.

या कार्यक्रमासाठी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, विष्णूपंत केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशिलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, संचालक काशिनाथ तेली, हरी कांबळे, तज्ञ संचालक रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, जनरल मॅनेजर (टेक्नी.) एम्.आर. पाटील, चिफ केमिस्ट सुजय देसाई, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, कामगार संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार, उपाध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी, कंत्राटदार व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...