आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
जनता सहकारी गृहतारण संस्था आजराची सुरूवात अत्यंत खडतर परिस्थितीत झाली असून संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पर्दापण केले आहे. याच टप्प्यावरती संस्थेने सभासदांच्या विश्वासास पात्र १०० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण केला आहे. ठेवी आणि कर्जाचा योग्य समतोल राखत संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्थेच्या या वाटचाली मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेकडून १६.६६ टक्के दिवाळी बोनस देत आहोत असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन मारूती मोरे यांनी केले.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देणारी आणि दिवाळी भेट म्हणून १६.६६ टक्के (दोन पगार) देणारी जनता गृहतारण संस्था ठामपणे पुढे जात आहे. १०० कोटी ठेवी पूर्ण केल्याबददल नुकतीच एक आगाऊ वेतनवाढ दिलेली असताना सुध्दा संस्थेने दिवाळी बोनस दिलेला आहे असे मत व्हा. चेअरमन प्रो. (डॉ). अशोक बाचूळकर यांनी व्यक्त केले. यावेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, ड्रेसकोड आणि मिठाईचे वाटप करून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणेत आल्या. याप्रसंगी संचालक रविंद्र आजगेकर, प्रशासकीय अधिकारी मारूती कुंभार, व शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आभार प्रकट करताना मॅनेजर मधुकर खवरे यांनी सांगितले की, संचालक मंडळाने नेहमीच कर्मचान्यांचे हित लक्षात घेतले आहे. त्यांनी दिलेली भेट आम्ही आनंदाने स्विकारून संस्थेच्या प्रगतीसाठी एक दिलाने काम करू.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment