आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कै.श्री.माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन,कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा २०२५ शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भादवण हायस्कूल,भादवणचे (ता. आजरा) सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना वीस वर्षांच्या सेवेतील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा अशा अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन राज्यस्तरीय माणिक शिक्षण सेवा गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागाचे सहसचिव डी. एस. पोवार उपस्थित होते. यावेळी मान्यवर म्हणून माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आर. जी. चौगले, शिक्षक नेते समन्वय समिती मोहन भोसले, गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, गोकुळ दूध संघ व्यवस्थापक आर. जी. पाटील, जि. प. सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक बँक चेअरमन शिवाजी रोडे पाटील, पदवीधर शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन,जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सदानंद शिंदे, प्राथमिक शिक्षक बँक संचालक अमर वरुटे व पद्मजा मेढे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील साहित्य, कला,क्रीडा,कृषी,शिक्षण,आरोग्य, गिर्यारोहण,अवयवदान,सामाजिक संस्था अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४५ गुणवंत मान्यवरांना "आदर्श पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
मनोगतामध्ये डॉ.रणधीर शिंदे यांनी समाजाला प्रोत्साहनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर डी. एस. पवार यांनी समाजातील गुणवंत व्यक्तींना प्रोत्साहन देऊन प्रेरणा देणाऱ्या फाउंडेशनचे कौतुक केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वतीने प्रशांत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. समाजातील विविध घटकातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर या पुरस्काराच्या रूपाने कौतुकाची थाप दिल्याने पुढील काळात यापेक्षाही चांगले कार्य करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक तुषार पाटील, अध्यक्षा सुनीता पाटील, उपाध्यक्ष डॉ. अजित सूर्यवंशी, सचिव धनश्री पाटील यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे समाजातील गुणवंत व्यक्तींना योग्य तो गौरव मिळून त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळेल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी भादवन हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र कुंभार, मदन देसाई, भारती कांबळे, पुंडलिक वडर, रामदास होरटे, व्ही. एस. कोळी, अस्मिता पाटील, शोभा कुंभार, विठ्ठल चौगुले, एस. एस. नाईक, मेघा चव्हाण, संदीप पाटील, शितल गुरव, अनिकेत भोसले, सुरेश गुरव उपस्थित होते. आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी, उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, सचिव अभिषेकदादा शिंपी, खजिनदार सुनील पाटील, उद्योजक सचिनभैय्या शिंपी, सर्व संचालक, मुख्याध्यापक आर. जी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य मिळाले.
====================
Subscribe to:
Post Comments (Atom)
इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आंबोली, विकास न्यूज नेटवर्क : आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो...
No comments:
Post a Comment