Friday, August 8, 2025

भावेश्वरी विकास सेवा संस्था सुलगांवच्या चेअरमनपदी वसंत देसाई तर व्हा. चेअरमन पदी सागर कसलकर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सुलगाव (ता. आजरा) येथील भावेश्वरी विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या संस्थेत आजरा साखर कारखाना व जनता बँकेचे संचालक रणजीत देसाई यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत माजी सरपंच वसंत आप्पासाहेब देसाई यांची चेअरमन पदी व माजी ग्रामपंचायत सदस्य सागर गुंडू कसलकर यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन व व्हा. चेअरमन पदांची नांवे गणपतराव कुंभार व दिनकर देसाई यांनी सुचविली त्यास संजय गुरव व महेश कांबळे यांनी अनुमोदन दिले.
   
भावेश्वरी विकास संस्थेची सन २०११ मध्ये स्थापना होवून सुलगांव सारख्या अल्प जमीन क्षेत्र असलेल्या छोट्याशा गावात संस्था सहकारी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करीत उत्तम प्रकारे सुरू आहे. संस्थेची स्थापनेपासून दरवर्षी १०० टक्के कर्ज वसुली होत असून सतत आॅडीट वर्ग 'अ' प्राप्त झाला आहे. यापुढेही संस्थेचा कारभार पारदर्शी व सभासदांच्या हीताचाच करणार असलेची ग्वाही नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी दिली. प्रमोद फडणीस, सहायक निबंधक श्रेणी -२ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी माजी अध्यक्ष रणजीत देसाई, सरपंच पांडुरंग खवरे, उपसरपंच सदानंद कदम, सदस्य प्रल्हाद देसाई, माजी सदस्य रविंद्र कदम, संस्थेचे  संचालक बबन देसाई, दशरथ लांडे, अनिल विठ्ठल देसाई, संचालिका श्रीमती विमल डोंगरे, शितल देसाई, संजय डोंगरे, आनंदा डोंगरे, सौरभ कसलकर तसेच सेक्रेटरी बसवराज उत्तुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
====================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...