कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सी.पी.आर.), कोल्हापूर कॅम्पसमधील विविध सेवा सुविधांचा लोकार्पण समारंभ शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांची कामाची गती आदर्शवत असल्याचे शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, संचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शाहू महाराज छत्रपती म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाची गती सोबत काम करीत असताना जवळून पाहता आली. त्यांनी केलेले काम आणि त्याचा पूर्णत्वाचा कालावधी नेहमीच आदर्श घ्यावा असाच असतो. यावेळी हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया विभाग नूतनीकरण यात अत्याधुनिक व सर्व सेवा सुविधायुक्त मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्ससह अद्ययावत आधुनिक यंत्रसामग्री, हृदय प्रत्यारोपण सुविधा, निर्जंतुकीकरण, व्हेंटिलेटर सुविधांसह एकूण १७ बेड्सचे दोन अतिदक्षता विभाग, अगदी एक दिवसाच्या नवजात बालकापासून पुढे आवश्यक हृदय शस्त्रक्रियासाठी अत्यावश्यक यंत्र व शस्त्रसामुग्रीसह हार्ट लंग मशीन यांचे लोकार्पण करण्यात आले. रुग्णांसाठी संगणकीकृत केसपेपर नोंदणी कक्ष, नवजात बालकांची ऐकू येण्याची क्षमता तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह कक्ष इ. सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे सीपीआर रुग्णालय आणि नव्याने उभारण्यात येणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यातून रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उपचारासाठी जावे अशी अद्ययावत व्यवस्था करणार आहे. सीपीआर हॉस्पिटल मध्ये ८८ कोटींची नूतनीकरणाची कामे सुरू असून येत्या दिवाळीनंतर सीपीआरचे रूपडं बदलणार आहे. या पद्धतीने राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात काम होईल असेही ते यावेळी म्हणाले.
===============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
No comments:
Post a Comment