Sunday, April 13, 2025

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आजरा येथे महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहून भारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पहिल्यांदा मांडणी केली. ते केवळ नकारात्मक मांडणी करीत राहिले नाहीत तर त्यांनी शेती, शेतकरी यांच्या विकासाची भूमिका मांडत पर्यायी विकासाचा पाया घातला. माथा ते पायथा असे नियोजन करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, गरज पडेल तिथे बाहेरून पाणी आणून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बंद पाईपने मोजून देण्याची मागणी त्यांनी पहिल्यांदा केली. जमीन पाणी नियोजनाची शास्त्रीय मांडणी पहिल्यांदा फुलेनी केली. जीवनाचे असे एकही क्षेत्र नसेल ज्या क्षेत्रात त्यानी काम केले नाही. साहित्य संस्कृती, शिक्षण, जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासह धर्मसुधारणा या सर्वच क्षेत्रात त्यानी अभूतपूर्व असे काम केले आहे. म्हणूनच ते आजही सर्वच चळवळीचे मार्गदर्शक आहेत, असेही कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितलं.

सुरवातीला दशरथ घुरे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश मोरुस्कर, सुरेश पाटील, महादेव मालव, यशवंत राणे, राखमाजी पाटील, आनंद मालव, लक्ष्मी जाधव, गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...