Sunday, April 13, 2025

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुका महाविकास आघाडी मार्फत फळे वाटप

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डि. पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजरा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली.

यावेळी संजयभाऊ सावंत, रविंद्र भाटले, विक्रम देसाई, नौशाद बुडडेखान, निसार लाडजी, बाकीव खेडेकर, आप्पासाहेब पाटील, रवी तळेवाडीकर, डॉ. सचीन शिंदे, डॉ. सागर तिऊरवाडकर, महादेव सुतार, नामदेव शिवणगेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
===================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...