आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आण्णा भाऊ आजरा सूतगिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांची नुकतीच सहकार भारती आजरा तालुका अध्यक्षपदी निवड झालेबददल आजरा सूतगिरणी येथे सत्कार करणेत आला. आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक आण्णा चराटी यांचे हस्ते व सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी यांचे प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला.
याप्रसंगी डॉ. अनिल देशपांडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सहकार भारती ही संस्था सहकारातील सर्व संस्थांची देशपातळीवरील संघटना आहे. जिचे मुख्य कार्य हे सहकारातील संस्थाना त्यांच्या कामकाजातील अडचणी दूर करणेसाठी तांत्रिक आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करणे. त्यांचे पदाधिकारी, अधिकारी यांना सतत मार्गदर्शन करत राहणे तसेच सहकार्य करणे. देशपातळीवरील राज्यस्तरावरील वित्तीय संस्थांकडून निधी उभारणी करीता मार्गदर्शन करणे तसेच सहकार्य करणे. तालुका पातळीवरील सेवा संस्था, दुध संस्था, पतसंस्था त्याचप्रमाणे महिला बचत गटांकरीता सहकाराचे माध्यमातून मोठे कार्य करणेचा मानस आहे. शेतकरी, भूमिहीन, वनवासी, कमी उत्पन्न गटातील बेरोजगार तरूण यांचेकरीता विविध उपक्रमाचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यरत राहणार आहोत. यासाठी आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक आण्णा चराटी यांचे मोठे सहकार्य अपेक्षीत आहे व ते मिळणार हा विश्वासदेखील आहे. सहकार भारती आजरा तालुका कार्यकारणीवर माझी निवड झालेबददल आपण माझे कौतुक केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
याप्रसंगी संस्थेचे संचालक जयसिंग देसाई, अविनाश सोनटक्के, नारायण मुरूकटे, जी. एम. पाटील, राजु पोतनीस, डॉ. संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, मालुताई शेवाळे, मनिषा कुरूणकर, अनिकेत चराटी, हसन शेख यांचेसह जनरल मॅनेजर अमोघ वाघ, अधिकारी दत्तात्रय दोरूगडे, सचिन सटाले उपस्थित होते.
=============
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment