Sunday, April 13, 2025

सहकार भारतीची आजरा तालुका कार्यकारणी जाहीर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
सहकार भारतीच्या आजरा तालुका कार्यकारिणीची बैठक आजरा येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये आजरा तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रात विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक आजरा तालुका सहकार भारती कार्यकारणी वर करण्यात आली. या कार्यकारणीवर श्रीपाद वामन कुलकर्णी, रमेश कारेकर, महादेव खाडे (उत्तुर), मिलिंद पुजारी,  सुनील मारुती पाटील (हालेवाडी), सुभाष विष्णू चौगुले (शिरसंगी), सुरेश राजाराम आसबे (होनेवाडी), श्रीधर सुधीर कुलकर्णी (आजरा), जोतिबा मुरकुटे (आजरा), जयवंत सुरेश येरुडकर (पेरनोली), दिपाली दशरथ अमृते (हाळोली), काजल संदीप कुलकर्णी (आजरा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांना आजरा तालुका कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांचे हस्ते नियुक्तीची पत्रे देण्यात आली. यानंतर अध्यक्षांनी सर्व सदस्यांना सहकार भारतीचे कार्य व कामकाजाची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील विविध अडचणी विषयी चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत कार्यकारणीचे सचिव मिलिंद पुजारी यांनी केले. आभार कार्यकारिणीचे महामंत्री श्रीपाद वामन कुलकर्णी यांनी मानले.

===================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...