Thursday, April 17, 2025

अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्याने पेरणोलीत गटारीचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
पेरणोली (ता. आजरा) येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सुरू असलेल्या गटारीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न झाल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पेरनोली ग्रामपंचायत निधीतून ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील गल्लीत दोन्ही बाजूला गटारीचे काम सुरू आहे. मात्र हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे सुरू नसल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत बुधवारी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. तरीही काम सुरू होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी गावातील तरुण व ग्रामस्थांनी गटारीची सुरू असलेले काम बंद पाडले. यानंतर आजरा पंचायत समितीचे अधिकारी मोरे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी या अधिकाऱ्यांसमोरच गटारीचे काम अंदाजपत्रकानुसार नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी सरपंच प्रियंका जाधव, ग्रामपंचायत सदस्य संकेत सावंत व इतर सदस्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी चुकीची कामे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतीच्या कारभारावर लक्ष असल्याचेही सांगितले.

याबाबत सरपंच प्रियांका जाधव व ग्रामपंचायत सदस्य संकेत सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, सुरू असलेल्या गटारीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे सुरू आहे. केवळ राजकीय विरोध म्हणून गावात सुरू असलेल्या विकास कामांना विरोध सुरू असल्याचे सांगितले. तसेच आमचा गावच्या हिताचा कारभार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
======================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...