Saturday, April 12, 2025

‘गोकुळ’ मार्फत आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्या वतीने माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत हनुमानाची मूर्ती वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आली तसेच गोकुळ परिवाराच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोकुळने रमजान ईद दिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करून २३ लाख ६३ हजार लिटर्स दुधाची विक्रमी दूध विक्री केलेबद्दल गोकुळचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, दूध उत्‍पादक,  ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे आमदार सतेज पाटील यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे,  संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर उपस्थित होते.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...