कोल्हापूर, जिमाका :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी शासनाच्या https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन वाहनांवर HSRP बसवण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही साईट्स/लिंक चा वापर करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि.06 डिसेंबर 2018 रोजीच्या राजपत्रानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दि.01 एप्रिल 2019 पासून उत्पादीत होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसवण्याबाबत तरतूद केली आहे. तसेच दि.01एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत HSRP बसवण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्याकरीता M/s. Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली आहे. या नमूद उत्पादक संस्थेने झोननिहाय अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार हे फिटमेंट सेंटर्स शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कामकाज करीत आहेत.
HSRP ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत वाहनधारकांच्या अनभिज्ञतेचा गैरफायदा घेण्याच्या हेतूने सायबर गुन्हेगारांनी शासनाच्या HSRP संकेतस्थळासारखी हुबेहूब बनावट साईट्स तयार केल्या आहेत. या बनावट साईट्वरती वाहनधारकांनी माहिती भरल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरून घेऊन फसवणूक केली जात आहे. अशाप्रकारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवण्यासाठी इतर कोणत्याही बनावट साईट्स/लिंकचा वापर न करण्याची खबरदारी सर्व वाहन मालकांनी घेणे आवश्यक आहे.
वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबवावी-
https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्या आणि HSRP हा Option सिलेक्ट करावा.
या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय निवडा (तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा)
यानंतर Submit बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला HSRP प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आपणास अधिकृत फिटमेंट सेंटर्सचा तपशील प्रदर्शित होईल.
तद्नंतर वाहनाशी संबंधीत मुलभूत माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह भरावी.
HSRP लावण्यासाठी सोईनुसार स्थापित बसविण्याचा दिनांक व वेळ निवडावी.
आवश्यक शुल्क भरणा करावा (रोख पैसे देण्याची गरज नाही)
अपॉइंटमेंट दिनांकास व वेळेस अधिकृत फिटमेंट (निवड केलेल्या) सेंटरला भेट देऊन वाहनावर HSRP स्थापित करून घ्यावे.
HSRP Booking Portal Link, Email and Contact Number-
https://mhhsrp.com
Email: customer support@mhhsrp.com
Customer Care: 7836888822
याप्रमाणे कार्यवाही करावी.
================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment