आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजप नेते अशोकआण्णा चराटी आणि भाजपाचे आजरा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या संयुक्त सौजन्याने शेतकरी बांधवासाठी होळीच्या सणाचे औचित्य साधून 50 टक्के सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप व वॉटर फिल्टर वाटप सुविधा केंद्राचा उदघाट्न सोहळा नुकताच पार पडला.
भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांचे हस्ते व अशोक आण्णा चराटी यांच्या प्रमुख उपस्थित हा उदघाट्न सोहळा संपन्न झाला. खास होळीनिमित्त शेतकरी बांधवासाठी उपयुक्त असणारे आणि वेळोवेळी आवश्यकता भासणाऱ्या औषधी फवारणी बॅटरी पंप व वॉटर फिल्टर गरीब व सर्वांसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक आण्णा चराटी व भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर यांच्या संयुक्त सौजन्याने हा विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे., असे श्री. केसरकर यांनी सांगितले. हा उपक्रम 18 मार्चपर्यंत सुरु असणार आह. यासाठी आधारकार्ड अथवा रेशन कार्ड झेरॉक्स आणि एक आयडेंटी साईझ फोटो अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे. शिवतीर्थ आजरा (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा )येथे हे केंद्र उभारण्यात आले असून गरजूनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक सिकंदर दरवाजकर, मारुती बिरजे, अंकुश चौगले, रुपेश परीट, शुभम पाटील, इब्राहिम दरवाजकर, रोहित बुरुड, अनिकेत देऊसकर, महेश पारपोलकर, सतीश शिंदे, कुणाल भोसले आदिसह स्वराज्य तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
===================
Subscribe to:
Post Comments (Atom)
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : सुशांत सुरेश गुरव (वय 35, रा. मडीलगे ता. आजरा) याने, बऱ्याच लोकांचे कडून व बॅन्केकडून कर्ज घेतलेली ...
-
आजरा, विकास न्यूजसेवा : भादवन (ता. आजरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या दहा सदस्यांन...
No comments:
Post a Comment